शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

महसूल खात्यावर खासगी गुप्तहेरांची नजर! चंद्रकांत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:55 AM

राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचा-यांचा भ्रष्टाचार व गैरकारभारावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक भेटीत दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

नाशिक : राज्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचा-यांचा भ्रष्टाचार व गैरकारभारावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक भेटीत दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी महसूल मंत्र्यांवर या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सोशल मीडियातून टीका होत आहे.मागील आठवड्यात झालेल्या महसूल खात्याच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलताना महसूल मंत्री पाटील यांनी खात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त केली. हे चित्र बदलण्यासाठी आता या खात्यातील अधिकारी, कर्मचाºयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र खासगी एजन्सी नेमण्यात आली असून या एजन्सीच्या माध्यमातून थेट पोलीस खात्यालाच ब्रिफिंग करण्याचे काम सोपविण्यात आल्याचे चंद्रकांतदादांनी सांगितले.सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भात पोस्ट फिरत आहेत. महसूल विभागच काय तर प्रत्येक शासकीय कार्यालयात नजर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते ‘अनुलोम’ या संस्थेच्या माध्यमातून अगोदरच नेमण्यात आले आहेत, हे आपणास माहीत नाही काय? महसूल विभागातील शेकडो अधिकारी व हजारो कर्मचारी यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम महसूल विभागाच्या कामकाजावर होत आहे. याची माहिती मंत्रालयात बसलेल्या झारीतील शुक्राचार्यांनी आपणास दिली नाही काय? असे सवाल महसूल मंत्री पाटील यांना विचारण्यात आले आहेत. राज्यातील ठराविक अधिकाºयांनाच चांगल्या व मोक्याच्या पोस्टिंग का मिळतात त्याचीसुद्धा माहिती आपण गुप्तहेर नेमून घ्यावी म्हणजे सत्य बाहेर येईल, असा टोलाही लगावण्यात आला आहे.महसूल विभागात सध्या उपजिल्हाधिकारी संवर्गाची जवळपास १२५ पदे रिक्त असून, गेल्या पाच वर्षांपासून तहसीलदार या पदावर पदोन्नत्या होऊ शकल्या नाहीत. राज्यातील शेकडो पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी काहीही कारण नसताना नदी व वाळू पट्ट्यात नेमके काय करतात त्याचीही माहिती आपण या गुप्तहेर लोकांकडून घेणार आहात काय? असा सवाल करण्यात आला आहे.अडचणींवर निबंध स्पर्धा!खात्यांतर्गत केल्या जाणाºया विभागीय चौकशीच्या फाईली दहा-दहा वर्षे प्रलंबित ठेवण्याची पद्धत चुकीची असून, यापुढे तीन महिन्यांच्या आत विभागीय चौकशी पूर्ण केली जावी, अशी सूचनाही पाटील यांनी केली. महसूल अधिकाºयांना जनतेची कामे करताना ज्या काही कायदेशीर अडचणी येतात त्यावर राज्यपातळीवर निबंध स्पर्धा घेण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला.बदल्यांतील भ्रष्टाचारासाठी गुप्तहेर नेमाराज्यातील प्रामाणिक, गरीब आणि सरळमार्गी अधिकाºयांना विदर्भ व मराठवाड्यात फेकले जात असताना ठराविक अधिकारी मात्र अमरपट्टा घेऊन आल्यासारखे मुंबई व पुणे या भागातच का पोस्टिंग मिळवित आहेत? याचीही आपण तातडीने गुप्तहेर नेमून चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील