पुलांच्या रचना तपासणीचे काम खासगी कंपनीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 05:23 IST2016-08-25T05:23:46+5:302016-08-25T05:23:46+5:30

राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांची रचनातपासणी करण्यास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे.

The private company has been working on the composition of the bridge | पुलांच्या रचना तपासणीचे काम खासगी कंपनीकडे

पुलांच्या रचना तपासणीचे काम खासगी कंपनीकडे

प्रवीण देसाई,

कोल्हापूर- राज्यातील ब्रिटिशकालीन पुलांची रचनातपासणी करण्यास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ही कंपनी १५ जुन्या पुलांची पावसाळ््यानंतर तपासणी करणार आहे.
महाड (जि. रायगड) येथील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पुरात वाहून गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने राज्यातील सर्वच पुलांची रचनातपासणी करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या सर्वच पुलांची तपासणी पावसाळ्यानंतर होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूलही याला अपवाद नाहीत. या पुलांवर नियंत्रण असलेल्या केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी केली जाणार आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये रचनातपासणी करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्तीचा निर्णय झाला.
ही कंपनी पुलांची तपासणी करणार असून, यामध्ये काही त्रुटी आढळल्यास उपायही सुचवून ते याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे. याची प्रत संबंधित जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)
>केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीकडून पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलासह जिल्ह्यातील अन्य चार पुलांची रचनातपासणी महिन्याभरानंतर होणार आहे.
- आर. के.बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभाग.

Web Title: The private company has been working on the composition of the bridge