शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याहून मुंबईकडे परतणारी खासगी बस कोकणात उलटली; दोघांचा मृत्यू तर 32 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 10:48 IST

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटूळ घाटात अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्दे मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटूळ घाटात अपघात झाल्याची माहिती मिळते आहेगोव्यावरून मुंबईला जाणारी जीए झिरो तीन एन ४७०४ गोव्याची लक्झरी बस वाटूळ घाटामध्ये उलटल्याची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी, दि. 2- गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या एका खासगी बसचा शुक्रवारी रात्री राजापूरमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत. राजापूरच्या वाटूळ गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस शुक्रवारी संध्याकाळी गोव्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले अनेक जण या बसने प्रवास करत होते. शनिवारी सकाळी ही बस बोरिवलीला पोहचणार होती. मात्र, काल रात्री वाटूळ गावाजवळ असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस उलटली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय, अपघातात ३२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लांजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवराम यशवंत परब (५८ रा. कालेलि कुडाळ) आणि रेखा रमाकांत पंडित (५५ रा. परळ, मुंबई) अशी मृत्यू झालेल्या दोन प्रवाशांची नावं आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात