पृथ्वीराज चव्हाणांचे फ्लेक्स फाडले !

By Admin | Updated: October 28, 2014 01:27 IST2014-10-28T01:27:52+5:302014-10-28T01:27:52+5:30

क:हाड तालुक्यातील नांदगाव येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निवडणुकीत विजय झाल्याबद्दल लावलेले दोन फ्लेक्स रविवारी रात्री अज्ञातांनी फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला.

Prithviraj Chavan flakes! | पृथ्वीराज चव्हाणांचे फ्लेक्स फाडले !

पृथ्वीराज चव्हाणांचे फ्लेक्स फाडले !

काले (जि़सातारा) : क:हाड तालुक्यातील नांदगाव येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निवडणुकीत विजय झाल्याबद्दल लावलेले दोन फ्लेक्स रविवारी रात्री अज्ञातांनी फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. सोमवारी दिवसभर गावात तणावपूर्ण शांतता होती़. 
क:हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ़ अतुल भोसले या यांच्यात अटीतटीची लढत झाली़ त्यात उंडाळकरांसह भोसले यांचा पराभव झाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. तब्बल 35 वर्षानंतर येथील लोकप्रतिनिधी बदलला. गावात बसस्थानक परिसर व सुकरे हॉस्पिटल भागातील दोन फ्लेक्स बोर्ड ब्लेडच्या साह्याने फाडण्यात आले होते.  (वार्ताहर) 

 

Web Title: Prithviraj Chavan flakes!