पृथ्वीराजबाबा रमणार राज्यातच !
By Admin | Updated: November 2, 2014 00:34 IST2014-11-01T23:34:26+5:302014-11-02T00:34:06+5:30
वर्षा बंगल्याचा घेतला निरोप : आता कऱ्हाडसह मुंबईतही संपर्क कार्यालय

पृथ्वीराजबाबा रमणार राज्यातच !
ठाणो : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे चारही खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्याची अभूतपूर्व कामगिरी करणारे आणि भाजपासोबत युती नसताना व मोदी लाट असतानाही शिवसेनेचे सहा आमदार ठाणो जिल्ह्यातून निवडून आणणारे जिल्हा व संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांना मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
वाटाघाटींच्या वेळी उद्धवजींनी शिवसेनेच्या कोटय़ातील ज्या दोन आमदारांना पहिल्या लॉटमध्ये मंत्रीपद मिळावे असा प्रस्ताव ठेवला होता त्यात सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांचाच समावेश होता. परंतु, काहीही झाले तरी फडणवीस मंत्रीमंडळाच्या पहिल्या टप्प्याच्या शपथविधीत शिवसेनेला स्थान द्यायचे नाही, अगदी राजकीय अपरिहार्यता म्हणून तिला सत्तेत सहभागी करून घ्यावे लागलेच तर विस्तारामध्ये तिच्या मंत्र्यांचा शपथविधी करावा अशी रणनीती भाजपाने आखली. त्यामुळे शिंदे आणि देसाई या दोघांचेही मंत्रीपद शुक्रवारी हुकले, अशी अंतस्थ सूत्रंची माहिती आहे. परंतु, शनिवारी भाजपा शिवसेनेच्या सत्तावाटपाबाबतच्या वाटाघाटी ब:याचशा पुढे सरकल्यामुळे मंत्रीमंडळातील शिवसेनेचा सहभाग हा आता निश्चित मानला जातो आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात मंत्रीमंडळाचा जो विस्तार होईल त्यात एकनाथ शिंदेंचे मंत्रीपद निश्चित मानले जाते आहे. त्यांना कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. जर असे घडून आले तर ते शांताराम घोलप, जगन्नाथ पाटील, साबीर शेख, गणोश नाईक, जितेंद्र आव्हाड यांची परंपरा पुढे चालवतील. एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी या मतदारासंघातून जिल्ह्यातल्या विक्रमी मतांसह व मताधिक्यासह निवडून आलेले आहेत. त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत हे कल्याणचे खासदार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
63 आमदारांसह उद्धव मंगळवारी एकवीरेच्या दर्शनाला
4विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या निवडून आलेल्या 63 नवनिर्वाचति आमदारांसोबत शिवसेनाकार्यप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2क्14 रोजी सकाळी 1क् वाजता कार्ला गडावर o्री एकवीरा देवीच्या दर्शनाला येणार आहेत.
4शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित 63 आमदारांच्या स्वागताची भव्य तयारी o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व विश्वस्त आणि कर्मचा:यांच्या वतीने करण्यात येत आहे.
4गडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित 63 आमदार यांचा जाहीर सत्कार o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे
4शिवसेनाप्रमुख व 63 आमदारांच्या माध्यमातून o्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांना सोईसुविधा मिळण्याकरीता मदत होणार असून पर्ा्िकगने गडावर जाण्याकरीता उभारल्या जाणा:या नियोजित लिफ्टला देखील चालना मिळणार आहे. भाविकांना सहजतेने, सुलभतेने दर्शन मिळावे याकरीता दर्शन रांग
लवकरच तयार होणार असल्याची माहिती एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते माजी आमदार अनंत तरे यांनी दिली.