नाशिकमध्ये कैद्यांची पोलिसांना मारहाण

By Admin | Updated: July 2, 2016 04:32 IST2016-07-02T04:32:34+5:302016-07-02T04:32:34+5:30

न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून कैदी घेऊन जाणाऱ्या पोलिसांना कैद्यांनीच मारहाण केल्याची घटना शुक्रवारी येथे घडली.

Prisoners beat up police in Nashik | नाशिकमध्ये कैद्यांची पोलिसांना मारहाण

नाशिकमध्ये कैद्यांची पोलिसांना मारहाण


नाशिकरोड : न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून कैदी घेऊन जाणाऱ्या पोलिसांना कैद्यांनीच मारहाण केल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
दुहेरी हत्याकांडातील पाच संशयितांना शुक्रवारी सकाळी पोलीस कैदी पार्टी कारागृहातून न्यायालयीन कामकाजासाठी घेऊन जात असताना गाडीमध्ये बसण्याच्या कारणावरून कैद्यांनी दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली.
सराईत गुन्हेगार अर्जून उर्फ वाट्या महेश आव्हाड व निखिल विलास गवळे यांचा खून करून त्र्यंबकेश्वरच्या तोरंगण घाटात त्यांचे मृतदेह फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित प्रिन्स चित्रसेन सिंग, सन्नी उर्फ ललित अशोक विठ्ठलकर, निखिल मधुकर निकुंभ, वतन शिवाजी पवार, किशोर सुखदेव गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर नाशिकरोड कारागृहात ठेवण्यात आले होते. नाशिक ग्रामीणची पोलीस कैदी पार्टी या पाच संशयित व इतर गुन्ह्यातील दोघा संशयितांना घेण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह येथे गेले होते. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यानंतर कैद्यांनी सरकारी गाडी नको, खासगी गाडी मागवा तरच येऊ अशी भूमिका घेतल्याने कैदी पार्टीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयितांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव, दीपक कोळी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत त्यांच्याशी झटापट केली. त्यामध्ये दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे गणवेश फाटले. कैदी पार्टीच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका करीत कैद्यांना गाडीतूनच नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणले. (प्रतिनिधी)

Web Title: Prisoners beat up police in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.