ठाणे कारागृहात कैद्याची आत्महत्या

By Admin | Updated: September 20, 2016 02:59 IST2016-09-20T02:59:08+5:302016-09-20T02:59:08+5:30

ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सिराज अलम रमजानअली शेख (२७) या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वा.च्या सुमारास घडली

Prisoner Suicide in Thane Prison | ठाणे कारागृहात कैद्याची आत्महत्या

ठाणे कारागृहात कैद्याची आत्महत्या


ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सिराज अलम रमजानअली शेख (२७) या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वा.च्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले.
मुंबईच्या बोरिवलीतील एका मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या प्रकरणात त्याला २०१५ मध्ये अटक झाली होती. तळोजा कारागृहातून त्याला ठाणे कारागृहात काही दिवसांपूर्वीच आणण्यात आले होते. त्याने आपल्या कोठडीतच गळफास लावून घेतल्याचे आढळले. त्याची तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Prisoner Suicide in Thane Prison