औरंगाबादमध्ये रुग्णालयात कैद्याची आत्महत्या
By Admin | Updated: March 9, 2016 13:39 IST2016-03-09T10:48:47+5:302016-03-09T13:39:26+5:30
एका 60 वर्षीय कैद्याने गळफास घेऊन घाटीतील 10 नंबर वार्डात आत्महत्या केली

औरंगाबादमध्ये रुग्णालयात कैद्याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि.९ - एका 60 वर्षीय कैद्याने गळफास घेऊन घाटीतील 10 नंबर वार्डात आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. आनंदा रामचंद्र गोसावी (रा. कोल्हपूर) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. तो हर्सूल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्याच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. 10 नंबर वार्ड हा कैद्यांचाच वार्ड आहे. येथे पोलीसही तैनात असतात तरीही कैद्याने कशी आत्महत्या केली, हे समजू शकले नाही.