कोल्हापूर कारागृहातून रजेवर आलेला कैदी फरार

By Admin | Updated: July 1, 2016 03:41 IST2016-07-01T03:41:40+5:302016-07-01T03:41:40+5:30

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी बाबू हणमंत नरसय्या हा कारागृहातून रजा घेऊन डोंबिवली येथे आला

A prisoner absconding from Kolhapur jail escaped | कोल्हापूर कारागृहातून रजेवर आलेला कैदी फरार

कोल्हापूर कारागृहातून रजेवर आलेला कैदी फरार


डोंबिवली : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी बाबू हणमंत नरसय्या हा कारागृहातून रजा घेऊन डोंबिवली येथे आला होता. २२ जूनला त्याची रजा संपली तरी तो कारागृहात न परतल्याने डोंबिवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी २००९ मध्ये बाबू नरसय्या (रा. शिवशंकरनगर, शेलार चौक) याला अटक केली होती. त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याची रवानगी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. २०१२ पासून तो तेथे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २५ मे ते २१ जूनदरम्यान तो कारागृहातून संचित रजेवर आला होता. २२ जूनला तो कारागृहात परतला नाही.

Web Title: A prisoner absconding from Kolhapur jail escaped