महिलेला विवस्त्र करणा-या ११ महिलांना तुरुंगवास
By Admin | Updated: December 30, 2015 13:46 IST2015-12-30T13:46:04+5:302015-12-30T13:46:04+5:30
२२ वर्षीय महिलेला विवस्त्र करुन तिची धिंड काढल्याच्या प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने अकरा महिला आणि एका पुरुषाला दोषी ठरवून दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

महिलेला विवस्त्र करणा-या ११ महिलांना तुरुंगवास
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - २२ वर्षीय महिलेला विवस्त्र करुन तिची धिंड काढल्याच्या प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने अकरा महिला आणि एका पुरुषाला दोषी ठरवून दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मुंबईत २०१० साली शिवडीमध्ये हे प्रकरण घडले होते.
विनयभंगाच्या प्रकरणात महिलांना दोषी ठरवता येणार नाही हा बचाव पक्षाचा युक्तीवाद सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. १७ जून २०१० रोजी जमावाने पीडित महिलेवर हल्ला केला होता. त्याआधी पीडित महिलेच्या भावाला चारवर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली होती.
पीडित महिलेच्या भावाने बलात्काराचा गुन्हा केला म्हणून जमावाने क्रोधित होऊन हे कृत्य केल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. आरोपींनी एकत्र जमून पीडित तरुणीला घराबाहेर काढले व तिचे कपडे फाडले हे अत्यंत अघोरी प्रकारामध्ये मोडणारे कृत्य आहे असे न्यायालयाने सांगितले. तरुणीला अपमानित करणे आणि तिच्या कुटुंबाला धडा शिकवणे हा त्यामागे हेतू होता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.