इंदापुरात डीजेला बंदी
By Admin | Updated: September 3, 2014 23:56 IST2014-09-03T23:56:46+5:302014-09-03T23:56:46+5:30
गणोश विसर्जन मिरवणुकीत इंदापूर शहर परिसरात डीजेला परवानगी नाकारण्यात आली आहे. गुलालाची उधळण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

इंदापुरात डीजेला बंदी
गणोश विसर्जन मिरवणूक : गुलालाची उधळण न करण्याचे आवाहन
इंदापूर : गणोश विसर्जन मिरवणुकीत इंदापूर शहर परिसरात डीजेला परवानगी नाकारण्यात आली आहे. गुलालाची उधळण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनाच्या आदल्या दिवशी व विसर्जनादिवशी दारूविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहरातील पारंपरिक विसर्जन मिरवणुकीच्या पद्धतीत कसलाही बदल करण्यात आलेला नाही. सकाळी साडेअकरापासून शहरातील नेहरू चौकातून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. प्रत्येक गणोश मंडळाला प्रत्येकी दहा मिनिटांचा अवधी त्या चौकात कलागुण प्रदर्शनासाठी दिला जाईल. रात्री अकरा वाजण्याआधी विसर्जन संपविण्याच्या दृष्टीने कटाक्ष ठेवण्यात आला आहे.
मिरवणुकीकरिता डीजेला, तसेच गुलाल उधळण्यास परवानगी नाकारली आहे. डीजेचा वापर करणा:या मंडळांवर व डीजे संचाच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. वाहने ताब्यात घेऊन ती आरटीओ कार्यालयाकडे पाठवून दिली जातील, याची मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करून कोंडुभैरी म्हणाले, की गणोशोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत मद्यविक्रीवर र्निबध घालण्यात आले आहेत. मद्याचा साठा सापडल्यास अगर मद्यविक्री करताना कुणी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. ा
4गणोशोत्सवाच्या काळात व विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शीघ्रकृती दलाची 15क् जणांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
4गुलालाऐवजी गुलाब पाकळ्यांची उधळण विसर्जन मिरवणुकीत करावी. नदी प्रदूषणाबाबत काळजी घ्यावी. गणोशस्थापनेपासून शहरात जे शांततेचे वातावरण राहिले आहे. ते कायम ठेवावे, असे आवाहन पो. नि. कोंडुभैरी यांनी केले.