मंदिराची मालमत्ता शोधण्याला प्राधान्य - मंदिर समितीचा निर्धार
By Admin | Updated: November 15, 2014 01:52 IST2014-11-15T01:52:05+5:302014-11-15T01:52:05+5:30
नियंत्रण मिळविण्याचा निर्धार केल्याची माहिती पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.

मंदिराची मालमत्ता शोधण्याला प्राधान्य - मंदिर समितीचा निर्धार
दीपक होमकर - पंढरपूर
मंदिराची प्रॉपर्टी शोधण्याला पहिले प्राधान्य असेल; मात्र जिल्ह्यासह राज्यभरात जी परिवार मंदिरे आहेत त्यांचाही शोध घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा निर्धार केल्याची माहिती पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी शिवाजी कादबाने यांची नियुक्ती झाली. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, मंदिरातील बडवे-उत्पात आणि सेवेकरी यांचा अधिकार संपुष्टात आल्याने जबाबदारी अधिक वाढली आहे. भाविकांसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन दर्शनाचा गैरवापर होताना दिसत आहे. बुकिंगच्या प्रिंटवर फोटो बदलून ङोरॉक्स काढणा:या भाविकांना मी पकडले आहे. त्यामुळे या सुविधेमध्ये सुधारणा करण्यातही मी स्वत: लक्ष घातले आहे.
‘दर्शनबारी’चीही दखल
वारीच्या काळात दर्शनबारीत थांबलेल्या भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तब्बल 12 - 14 तास लागतात. त्याचा आँखो देखा हालही ‘लोकमत’ने कार्तिकी वारीत मांडला होता. त्यामुळे भाविकांचा हा खडतर प्रवास कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठी अभ्यास सुरू केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.