नदीजोड प्रकल्प, कृषी सिंचनाला प्राधान्य
By Admin | Updated: October 13, 2014 04:46 IST2014-10-13T04:46:59+5:302014-10-13T04:46:59+5:30
शेतक-याला शासनाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला केवळ शेतीसाठी पाणी हवे आहे.

नदीजोड प्रकल्प, कृषी सिंचनाला प्राधान्य
पंढरपूर : शेतक-याला शासनाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला केवळ शेतीसाठी पाणी हवे आहे. त्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला प्राधान्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले.
चंद्रभागा मैदानावरील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी सुखी नाही. दरवर्षी महाराष्ट्रात ३,७०० शेतकरी आत्महत्या करतात. पाण्याअभावी मृत होत चाललेल्या नदीला पुन्हा जिवंत करणाऱ्या योजनांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणाची आवश्यकता व्यक्त करताना त्यांनी तीर्थक्षेत्राला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
२०१४ हे वर्ष काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे शेवटचे वर्ष असल्याचे सांगून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दु:खे दूर केली जातील. महाराष्ट्रातील सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी महायुतीला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन मोदींनी केले. (प्रतिनिधी)