भविष्यात दूरशिक्षणालाच प्राधान्य
By Admin | Updated: June 7, 2015 02:45 IST2015-06-07T02:45:39+5:302015-06-07T02:45:39+5:30
गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शिक्षणपद्धतीबरोबरच दूरशिक्षण पद्धतीचा उदय झाला. सध्या ज्ञानसंपादनासाठी जगभरात दूरशिक्षण हाच महत्त्वाचा प्रवाह बनला आहे.

भविष्यात दूरशिक्षणालाच प्राधान्य
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शिक्षणपद्धतीबरोबरच दूरशिक्षण पद्धतीचा उदय झाला. सध्या ज्ञानसंपादनासाठी जगभरात दूरशिक्षण हाच महत्त्वाचा प्रवाह बनला आहे. भविष्यात या शिक्षणपद्धतीलाच प्राधान्य दिले जाणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या दृकश्राव्य व ग्रंथनिर्मिती केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. ‘यशवाणी’ या वेबरेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात बदल झाला असल्याचे स्पष्ट केले.
‘लोकमत’द्वारे घेतली माहिती
राज्यपाल सी. विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात पालकमंत्री गिरीश महाजन व प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी ‘लोकमत’मध्ये स्वच्छता मोहिमेचे प्रसिद्ध झालेले वृत्तांकन राज्यपालांना आवर्जून सादर केले.
पालकमंत्र्यांसाठी राज्यपाल ताटकळले
कोणतीही बैठक असो वा कार्यक्रम, तेथे उशिरा पोहोचण्याचा कित्ता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चक्क राज्यपालांच्या कार्यक्रमातही गिरवला. पालकमंत्री उशिरा पोहोचल्याने खुद्द राज्यपालांना कोनशिला अनावरणासाठी काही मिनिटे ताटकळावे लागले.