शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या संधी, पिण्याचे पाणी, कृषीकर्ज उपलब्धतेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:03 IST

कौल महाराष्ट्रचा : राज्यातील मतदारांना भेडसावतात या समस्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील प्रचार लोकांच्या दैनंदिन प्रश्नांऐवजी वैयक्तिक हल्ले, अनावश्यक गोष्टींवर भर तसेच आरोप-प्रत्यारोपांत हरवला असल्याची टीका होत असताना महाराष्ट्रातील लोकांचे मात्र रोजगाराच्या चांगल्या संधी, पिण्याचे पाणी आणि कृषीकर्ज उपलब्धता हे प्राधान्यक्रमाचे विषय असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने केलेल्या मतदार सर्वेक्षणावर आधारित अहवालातून पुढे आले आहे.

महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणारा हा अहवाल राज्यातील मतदारांनी नमूद केल्याप्रमाणे १0 सर्वांत महत्त्वाच्या प्रशासकीय समस्यांवर भर देतो. मतदारांचे प्राधान्यक्रम प्रतिसादकांच्या मते सरकारच्या त्या समस्यांवरील कामगिरीच्या संदर्भात अभ्यासण्यात आले आहेत. सर्वेक्षणात महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमधील सुमारे २४,000 प्रतिसादकांची मते तपासण्यात आली.४२.१0 टक्के मतदारांचे रोजगाराच्या चांगल्या संधी, ३७.५३ टक्के लोकांचे पिण्याचे पाणी आणि २९ टक्के प्रतिसादकांचे कृषीकर्ज उपलब्धता याप्रमाणे पहिले तीन प्राधान्यक्रम आहेत. मतदारांच्या सर्वोच्च तीन प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी रोजगाराच्या चांगल्या संधींबाबत (५ पैकी २.४८), पिण्याचे पाणी (२.५२) आणि कृषी कर्ज उपलब्धता (२.३५) म्हणजे सरासरीपेक्षा कमी अभिप्राय असल्याचे नोंदवले गेले आहे.विशिष्ट शासन समस्यांबाबत मतदारांचे प्राधान्य. त्या समस्यांसंबंधी सरकारच्या कामगिरीबाबत मतदारांनी दिलेले रेटिंग आणि मतदान वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक याचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.

सरकारने बियाणे/खतांसाठी कृषी सवलत देण्याबाबत (२.२४) आणि शेतीसाठी वीजपुरवठा (२.२७) करण्याबाबत लोकांच्या मते अत्यंत वाईट कामगिरी केली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मतदारांचे सर्वोच्च तीन प्राधान्यक्रम कृषीकर्ज उपलब्धता (५१%), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (४९%) आणि कृषी उत्पादनांना चांगला बाजारभाव (४६%) हे होते. ग्रामीण मतदारांच्या तीन सर्वोच्च प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी कृषीकर्ज उपलब्धतेबाबत (५ पैकी २.३५), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (२.२९) आणि कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव (२.१७) यांबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदवले गेले.ग्रामीण मतदारांचे प्राधान्यक्रम51% कृषी कर्ज उपलब्धता49% शेतीसाठी पाण्याची उपलब्धता46% कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव46% सरकारची बियाणे/खतांसाठी कृषी सवलत38% शेतीसाठी वीज37% रोजगाराच्या चांगल्या संधी33% पिण्याचे पाणी27% चांगली वैद्यकीय सेवा23% नदीतून वाळू उपसा21% चांगले रस्ते

महाराष्ट्रातील शहरी मतदारांसाठी तीन सर्वोच्च प्राधान्यक्रम48%चांगल्या रोजगार संधी43%पिण्याचे पाणी35%वाहतूक-कोंडीग्रामीण महाराष्ट्रात मतदारांचे सर्वोच्च तीन प्राधान्यक्रम कृषीकर्ज उपलब्धता (५१%), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (४९%) आणि कृषी उत्पादनांना चांगला बाजारभाव (४६%) हे होते. ग्रामीण मतदारांच्या तीन सर्वोच्च प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी कृषीकर्ज उपलब्धतेबाबत (५ पैकी २.३५), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (२.२९) आणि कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव (२.१७) यांबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदवले गेले.

शहरी मतदारांच्या सर्वोच्च तीन प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी चांगल्या रोजगाराच्या संधींबाबत (२.२७), पिण्याचे पाणी (२.३२) आणि वाहतूककोंडी (२.१०) याबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, ध्वनिप्रदूषण (२.१७) आणि चांगले रस्ते (२.३२) याबाबत सरकारने अत्यंत वाईट कामगिरी केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :jobनोकरीFarmerशेतकरीWaterपाणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक