प्रिंटेड छत्री
By Admin | Updated: June 24, 2015 01:26 IST2015-06-24T01:26:55+5:302015-06-24T01:26:55+5:30
बाल दोस्तांनो, तुम्हाला पावसात भिजायची इच्छा होत असेलच ना? पण काय करणार शाळेचा गणवेश आणि बॅग भिजू नये यासाठी रेनकोटशिवाय पर्याय नाही.

प्रिंटेड छत्री
बाल दोस्तांनो, तुम्हाला पावसात भिजायची इच्छा होत असेलच ना? पण काय करणार शाळेचा गणवेश आणि बॅग भिजू नये यासाठी रेनकोटशिवाय पर्याय नाही. पण शाळेतून घरी आल्यावर मित्रांचा भिजण्याचा प्लॅन झाला असेल आणि आईने जबरदस्तीने बाबांची जुनी छत्री घेऊन जायला सांगितलं तर? त्यापेक्षा तुम्ही स्वत:साठी एक कलरफूल छत्री घेऊनच टाका. बाजारात मुलींसाठी खास फ्लोरल प्रिंटच्या, तर मुलांसाठी हॉट रोड प्रिंटच्या छत्र्या उपलब्ध आहेत. तसेच बेडूक, बदक, किटी, हनी बी, फुलपाखरू अशा विविध आकाराच्या छत्र्यासुद्धा मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खाऊन जातील. चला तर लवकर हा पावसाळा संपायच्या आधी एक फेरी बाजारात मारा. बघा तुम्हाला कोणती हटके छत्री आवडतेय ती. - सायली कडू