नगरमध्ये ‘उमराव’ हॉटेलवर छापा
By Admin | Updated: May 20, 2017 00:49 IST2017-05-20T00:49:12+5:302017-05-20T00:49:12+5:30
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री पाइपलाइन रोडवरील श्रीराम चौकाजवळील ‘हॉटेल उमराव’वर छापा टाकून २८ जणांना पकडले़ परवाना
_ns.jpg)
नगरमध्ये ‘उमराव’ हॉटेलवर छापा
- लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री पाइपलाइन रोडवरील श्रीराम चौकाजवळील ‘हॉटेल उमराव’वर छापा टाकून २८ जणांना पकडले़ परवाना नसताना या हॉटेलमध्ये सर्रास मद्यविक्री सुरू होती़ छापा पडला तेव्हा तेथे व्यापारी, बिल्डर, तर काही डॉक्टर मंडळी पार्टी करत होती. त्यातील २८ जणांना ताब्यात घेण्यात आले, मात्र अन्य दोघे पळून गेले़ या वेळी १३ हजार ५०० रुपयांचे मद्य हस्तगत केले़ हॉटेलमालक विशाल पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागा मालकाचीही संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे़