पिंपरीतील सहकारी बँकेवर प्राप्तीकर खात्याचा छापा
By Admin | Updated: September 26, 2016 23:11 IST2016-09-26T23:11:18+5:302016-09-26T23:11:18+5:30
पिंपरीतील एका सहकारी बँकेवर प्राप्तीकर विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी रात्री धाड टाकली. प्राप्तीकर विभागाच्या पथकातील अधिकाºयांनी पिंपरीतील बँकेच्या कार्यालयातील कागदपत्रांची

पिंपरीतील सहकारी बँकेवर प्राप्तीकर खात्याचा छापा
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 26 - पिंपरीतील एका सहकारी बँकेवर प्राप्तीकर विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी रात्री धाड टाकली. प्राप्तीकर विभागाच्या पथकातील अधिका-यांनी पिंपरीतील बँकेच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु असल्याने याबाबतची चर्चा शहरात पसरली.
संचालक मंडळाच्या निवडणुकीवेळी टोकाचे वाद विवाद तसेच नेहमीच राजकारण खेळले जाते, अशा या सहकारी बँकेच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकल्याचे पसरताच, पिंपरी बाजारपेठेत उलटसुलट चर्चा सुरू झाली. रात्री ११ वाजताही या बँकेच्या कार्यालयाजवळ नेमके काय चालले आहे, या उत्कंठेपोटी अनेकजण जमा झाले होते. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाºयांकडून मात्र या कारवाईची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.