काटेवाडीत दूध संकलन केंद्रावर छापा
By Admin | Updated: September 16, 2014 23:04 IST2014-09-16T23:04:01+5:302014-09-16T23:04:01+5:30
बारामती येथील काटेवाडी दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला.

काटेवाडीत दूध संकलन केंद्रावर छापा
काटेवाडी: बारामती येथील काटेवाडी दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात आढळून आलेल्या पावडर व जप्त केलेल्या रसायन तपासणीच्या अहवालावरून कारवाई करण्यात येणार आहे.
पुणो येथील अन्न व औषध प्रशासन पथकाच्या सहायक आयुक्तांकडे याबाबत भेसळ होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन अन्न विभागाचे सहायक आयुक्त संजय नारांगुडे व दिलीप संगत यांच्या पथकाने मंगळवारी (दि. 16) काटेवाडी येथील दूध संकलन केंद्रावर सकाळी छापा टाकला. त्या वेळी संस्थेचे चेअरमन नवनाथ ठोंबरे व कर्मचारी भेसळ करताना आढळून आले. तपासणीत ग्लुकोज पावडर आढळली. या पावडरचा साठा करणो बेकायदेशीर आहे. त्यामुळे पावडरसह इतर साहित्य, रसायने तपासणीकरिता ताब्यात घेण्यात आली, तर भेसळ केलेले हजार लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.
अन्न सहायक आयुक्त नारांगुडे व संगत आदींसह अन्न सुरक्षा अधिकारी युवराज ढेंबरे, अविनाश दाभाडे, आर. आर. काकडे, आर. बी. कुलकर्णी आदी या पथकामध्ये सहभागी
झाले होते.
उशिरार्पयत पथकातील अधिकारी कसून चौकशी करत होते. या पथकाने दूध संकलन केंद्राचे नवनाथ ठोंबरे यांच्या किराणा दुकानाचीसुद्धा तपासणी केली. काटेवाडी परिसरात अनेक दूध संस्थेच्या वतीने हजारो लिटर दूध संकलन करण्यात येते. पथकाने दूध संकलन करून रिकामे दुधाचे कॅन घेऊन निघालेल्या अंथुण्रे (ता. इंदापूर) येथील मधुकर धापटे याचे चारचाकी वाहन थांबवून माहिती घेतली. त्यामुळे परिसरातील अनेक दूध संकलन संस्थांचे धाबे दणाणलेले आहेत. मागील चार महिन्यांपूर्वी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे छापा टाकण्यात आला होता. तीच परिस्थिती काटेवाडीतील या दूध संकलन केंद्रात आढळून आली. तपासणी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न सहायक आयुक्त नारागुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील काही वर्षापूर्वी उघडकीस आलेले दूध भेसळ प्रकरण खूप गाजले होते. येथील युवा दुकानदार या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार होता. बारामती, फलटण आदी भागांत तो भेसळीचे सामान पुरवीत असल्याचे उघडकीस आले होते. फलटणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिका:यांनी ही कारवाई केली होती. या पाश्र्वभूमीवर काटेवाडीतील या छाप्याची परिसरात दिवसभर चर्चा होती.