आणखी एका बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजवर छापा
By Admin | Updated: June 19, 2017 01:44 IST2017-06-19T01:44:53+5:302017-06-19T01:44:53+5:30
शहरातील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसरापाठोपाठ शाम नगरातील तिसऱ्या बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजवर एटीएस पथकाने रविवारी दुपारी

आणखी एका बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजवर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शहरातील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसरापाठोपाठ शाम नगरातील तिसऱ्या बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंजवर एटीएस पथकाने रविवारी दुपारी छापा टाकला. या एक्स्चेंजचा चालक फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.
शहरातील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसरात बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या रवी राजकुमार साबदे (२७) आणि शंकर रामदास बिरादार (३३) या दोघांना औरंगाबाद, लातूर एटीएस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली होती. शाम नगर येथे भाड्याने खोली घेऊन आणखीन एक बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उभारल्याची माहिती या दोघांनी चौकशीदरम्यान दिली. या आधारे लातूर एटीएसच्या पथकाने रविवारी दुपारी शाम नगर येथे छापा टाकला. मात्र टेलिफोन एक्स्चेंज चालविणारा संजय केरबावाले हा खोलीला कुलूप लावून पसार झाला होता. या सेंटरवरूनही देश, विदेशात कॉलिंग करण्यात आले आहेत. येथून एटीएसने रिलायन्स कंपनीची एकूण ३८ सीमकार्ड, ८० हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.