पंतप्रधानांचा सुपरफास्ट दौरा
By Admin | Updated: August 19, 2014 01:01 IST2014-08-19T01:01:00+5:302014-08-19T01:01:00+5:30
जिल्हा प्रशासन, नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस यंत्रणेसह संपूर्ण नागपूरकरांचे गेल्या आठवड्यापासून ज्याकडे लक्ष लागले होते तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ आॅगस्टचा नागपूर दौऱ्याचा अधिकृत

पंतप्रधानांचा सुपरफास्ट दौरा
प्रतीक्षा संपली : चार तासांत दोन कार्यक्रम
नागपूर : जिल्हा प्रशासन, नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस यंत्रणेसह संपूर्ण नागपूरकरांचे गेल्या आठवड्यापासून ज्याकडे लक्ष लागले होते तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ आॅगस्टचा नागपूर दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे मोदी येणार हे निश्चित झाले असून, मंगळवारपासून प्रशासकीय आणि भाजपच्या पातळीवर तयारीला वेग येणार आहे.
पंतप्रधान नागपूरला येणार हे एनटीपीसी मौदा यांना आलेल्या पत्रामुळे उघड झाले. त्यानंतर त्यांचा नागपूरसह देवळीलाही कार्यक्रम होईल, असे भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत सांगण्यात आले. दौरा प्राप्त न झाल्याने पोलीस आणि जिल्हा प्रशासनही तयारीच्या कामाला लागू शकत नव्हते. काही दिवस वाट पाहिल्यावर प्रशासनाने प्राथमिक तयारीला सुरुवात केली; तरी रोज दौऱ्याच्या कार्यक्रमाची वाट पाहणे सुरूच होते. दरम्यान, मोदी यांचा देवळी दौरा रद्द झाल्याची बातमी आली. त्यामुळे दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम केव्हा येतो, याकडेच डोळे लागले होते. प्रशासनाकडे यासंदर्भात रोज विचारणा करण्यात येत होती. सोमवारी दुपारी अखेर दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबतची अनिश्चितता संपली.
प्राप्त दौऱ्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २१ आॅगस्टला दुपारी ३.०५ मिनिटांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रांची येथून वायुदलाच्या विमानाने आगमन होईल. दुपारी ३.१० वाजता ते तेथूनच हेलिकॉप्टरने मौद्याकडे रवाना होतील. ३.३५ वाजता त्यांचे मौदा येथे आगमन होईल. तेथे त्यांच्या हस्ते एनटीपीसीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल. ५ वाजता ते मौद्याहून नागपूर विमानतळाकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. ७.२५ वाजता नागपूर विमानतळावर आगमन आणि तेथून वाहनाने ते ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर पोहोचतील. ५.४५ ते ६.४५ या दरम्यान ते येथे आयोजित मेट्रो रेल्वे प्रकल्प, पारडी नाका उड्डाण पुलासह इतरही विविध विकास कामांचे भूमिपूजन करतील. त्यानंतर ते विमानतळाकडे रवाना होतील. रात्री ७.१० वाजता दिल्लीकडे प्रयाण करतील. सध्या तरी मोदींच्या दौऱ्यात संघ मुख्यालय, स्मृतिमंदिर वा इतर स्थळांना भेटीचा समावेश नाही. चार तासांचा त्यांचा दौरा आहे. त्यात वेळेपर्यंत बदल अपेक्षित आहेत. (प्रतिनिधी)
असा आहे दौैरा
वेळ कार्यक्रम
दु.३.०५ रांची येथून नागपूर विमानतळावर आगमन
३.१० हेलिकॉप्टरने मौद्याकडे प्रयाण
३.३५ मौदा हेलिपॅडवर आगमन
३.४ ५ते ४.४५ मौदा औष्णिक वीज प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे देशाला लोकार्पण
५ वा. मौदा येथून नागपूरकडे प्रयाण
५.२५ नागपूर विमानतळावर आगमन
५.३० कस्तूरचंद पार्ककडे कारने रवाना
५.४५ कस्तूरचंद पार्कवर आगमन
५.४५ ते ६.४५कस्तूरचंद पार्कवरील कार्यक्रमात उपस्थिती
रात्री ७.१० नागपूरहून दिल्लीकडे प्रयाण