शपविधी सोहळयात पंतप्रधानांची सुरक्षा भेदली?
By Admin | Updated: November 7, 2014 05:03 IST2014-11-07T05:03:48+5:302014-11-07T05:03:48+5:30
वानखेडे स्टेडीयमवरील मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून अनिल मिश्रा नावाची व्यक्ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ पोहोचल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते संजय बेडीया यांनी केला आहे

शपविधी सोहळयात पंतप्रधानांची सुरक्षा भेदली?
मुंबई : नवनियुक्त सरकारच्या शपथविधी सोहळयात वानखेडे स्टेडीयमवरील मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून अनिल मिश्रा नावाची व्यक्ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ पोहोचल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते संजय बेडीया यांनी केला आहे. मिश्रावर कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली आहे.
बेडीया यांनी दाखल केलेल्या लेखी अर्जाप्रमाणे मिश्रा या व्यक्तीचा भाजपशी संंबंध नाही. शपथविधी सोहळ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही व्यासपीठावर जाण्याची परवानगी नव्हती. मात्र असे असताना मिश्रा व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच त्यांनी मोदींसह अन्य नेत्यांसोबत छायाचित्रे काढली. मिश्राकडे प्रवेशपत्र नव्हते. असे असताना मिश्रा स्टेडीयमच्या आत कसे पोहोचले याच्या तपासाची मागणी बेडीया यांनी अर्जात केली आहे. (प्रतिनिधी)