शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: "भारत माता की...", राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज घुमणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:16 IST

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज घुमणार आहे.

चंद्रपूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरनंतर ते आज चंद्रपूरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पोहोचले. चंद्रपूरमध्येही राज ठाकरेमनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष बांधणीसाठी काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत. पण या दौऱ्यानंतर राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज घुमणार आहे. हो, हे खरं आहे. पण तुम्ही विचार करत असाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज ठाकरेंची भेट घेणार की काय? पण तसं नाहीय. तर चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक खास गिफ्ट दिलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकू येणारी एक खास भेटवस्तू सुनील मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर आता मोदींचा आवाज घुमणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राज ठाकरेंना सदिच्छा भेट म्हणून एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करुन दिलं आहे. त्यासोबतच एक राष्ट्रध्वजाचं सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. या सन्मान चिन्हामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक रेकॉर्डेड भाषण ऐकू येतं. 

राज ठाकरेंचा विदर्भ दौरा अन् भाजपा नेत्यांच्या भेटीगाठीराज ठाकरे रविवारी नागपूरात दाखल झाले आहेत. नागपुरात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निमंत्रण स्विकारत फुटाळा तलावावरील लेझर शोला उपस्थिती लावली होती. तर दुसऱ्या दिवशी राज ठाकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही भेटीसाठी पोहोचले होते. नागपूरमध्ये काल पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी नागपूरमधील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करत असल्याचं जाहीर केलं. 

घटस्थापनेदिवशी राज ठाकरे नागपुरातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करणार आहे. पक्षाला १६ वर्ष होऊनही नागपुरात पक्ष वाढीसाठी हवं तसं काम केलं गेलं नाही आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी पदं बरखास्त करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. नागपूरनंतर राज ठाकरे दोन दिवस चंद्रपूरमध्ये असणार आहे. चंद्रपुरात राज ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार