पंतप्रधान मोदी आज गोंदियात

By Admin | Updated: October 5, 2014 00:58 IST2014-10-05T00:58:58+5:302014-10-05T00:58:58+5:30

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने दिग्गज मैदानात उतरविले आहे. पक्षाचे स्टार प्रचारक व पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर

Prime Minister Modi today in Gondiya | पंतप्रधान मोदी आज गोंदियात

पंतप्रधान मोदी आज गोंदियात

गोंदिया/नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने दिग्गज मैदानात उतरविले आहे. पक्षाचे स्टार प्रचारक व पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर विदर्भात येणार आहेत. ५ आॅक्टोबरला ५.३० वाजता मोदी यांची गोंदिया येथे जाहीर सभा होणार आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने विदर्भावर जास्त लक्ष केंद्रित केले असल्याचे या भागातील दिग्गज नेत्यांच्या सभांवरून स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील प्रचार सभांचा कार्यक्रम पक्षाकडून कळविण्यात आला आहे. ७ आॅक्टोबरला त्यांच्या विदर्भातील सिंदखेडराजा (जि.-बुलडाणा) स. ११ वा आणि खामगाव (जि.-बुलडाणा) येथे , दुपारी २.४० वा. आणि याच दिवशी सायं. ७ वा. नागपूर येथील कस्तुरचंद पार्क येथे त्यांची सभा होणार आहे. १० आॅक्टोबरला स. १०.३० वा. ब्रह्मपुरी तर १२.४५ ला. धामणगाव येथे मोदी यांच्या सभा होणार आहेत.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह रविवार ५ आॅक्टोबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्यांच्या प्रचार सभा होतील. स.११ वा. ते उमरखेड येथे, दुपारी १ वाजता चिमूर येथे तर दुपारी ४.३० वा. वरोरा येथे प्रचार सभांना संबोधित करतील.
त्यांचा दौरा हेलिकॉप्टरद्वारे होणार आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर रविवारी नागपूरमध्ये येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Prime Minister Modi today in Gondiya