स्वतंत्र विदर्भासाठी पंतप्रधान अनुकूल

By Admin | Updated: November 24, 2014 01:14 IST2014-11-24T01:14:24+5:302014-11-24T01:14:24+5:30

भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच

Prime Minister of Independent Vidarbha | स्वतंत्र विदर्भासाठी पंतप्रधान अनुकूल

स्वतंत्र विदर्भासाठी पंतप्रधान अनुकूल

नागपूर : भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच यासंदर्भात ठराव मान्य केला असून, वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीला पाठिंबा आहे. योग्य वेळी विदर्भ राज्याची निर्मिती होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट) आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या चर्चासत्रादरम्यान नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली.
मोदी यांनी मुंबईसंदर्भात वक्तव्य करताना राज्य तुटू देणार नाही, असे म्हटले होते. वेगळ््या विदर्भाला पंतप्रधानांचा विरोध असल्याचा अपप्रचार होत आहे. मुळात त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. त्यांचा विदर्भाला विरोध नाही. योग्य वेळ येताच राज्याची निर्मिती होईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीसाठी काँग्रेसनेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आजपर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही, त्यासाठी येथील नेतेच ७५ टक्के जबाबदार आहेत. नवीन राज्य निर्माण झाल्यावर विकास होईलच, यात पूर्ण तथ्य नाही. त्यासाठी योग्य नेतृत्व, नेतृत्वाला विकास दृष्टी आणि निर्णयक्षमता आवश्यक असते. भाजपने वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीचा ठराव अगोदरच मंजूर केला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत व त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे ते म्हणाले. देशात ‘वन मॅन शो’ सुरू नसून लोकशाही पद्धतीनेच निर्णय घेतले जातात, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Prime Minister of Independent Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.