मुंबई हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

By Admin | Updated: November 26, 2014 11:13 IST2014-11-26T09:21:31+5:302014-11-26T11:13:39+5:30

मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज ६ वर्ष पूर्ण झाली असून या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेले नागरिक व शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

Prime Minister commemorates the martyrs of the Mumbai attacks | मुंबई हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज ६ वर्ष पूर्ण झाली असून या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेले नागरिक व शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
आजच्या दिवशी घडलेल्या त्या भयानक हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्या निष्पाप स्त्री-पुरुषांना मी श्रद्धांजवी वाहतो. तसेच या हल्ल्यात अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणा-या जवानांनाही मी नमन करतो. ते देशातील खरे हिरो आहेत. दहशतवादाशी लढणे आणि समाजातून तो उखडून टाकणे यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, असेही पंतप्रधनांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११तील हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुरक्षित राज्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रांनी सक्षम करू, असेही आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Web Title: Prime Minister commemorates the martyrs of the Mumbai attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.