जेजुरीच्या पैशांवर पुजाऱ्यांचा डल्ला

By Admin | Updated: December 18, 2015 01:07 IST2015-12-18T01:07:52+5:302015-12-18T01:07:52+5:30

जेजुरी देवस्थानातील पुजारी भाविकांनी देवाच्या गाभाऱ्यात टाकलेले पैसे पिशवीत भरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फूटेज धर्मदाय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाले आहे.

The priests scolded Jejuri's money | जेजुरीच्या पैशांवर पुजाऱ्यांचा डल्ला

जेजुरीच्या पैशांवर पुजाऱ्यांचा डल्ला

पुणे : जेजुरी देवस्थानातील पुजारी भाविकांनी देवाच्या गाभाऱ्यात टाकलेले पैसे पिशवीत भरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फूटेज धर्मदाय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाले आहे.
घटनेची चौकशी करून फौजदारी कारवाई करावी, असे आदेश सह धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाला दिले आहेत. विश्वतांनी आठ दिवसांत यासंदर्भात खुलासा सादर करावा, अशी नोटीस आयुक्तांनी दिली आहे.
अद्याप आम्हाला धर्मादाय आयुक्तांची नोटीस मिळालेली नाही, असे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. दशरथ घोरपडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The priests scolded Jejuri's money