पुरोहितची उच्च न्यायालयात धाव
By Admin | Updated: October 20, 2016 05:41 IST2016-10-20T05:41:04+5:302016-10-20T05:41:04+5:30
लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितने विशेष सत्र न्यायालयाच्या जामीन नाकारण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

पुरोहितची उच्च न्यायालयात धाव
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यापाठोपाठ लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितने विशेष सत्र न्यायालयाच्या जामीन नाकारण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी पुरोहितला नोव्हेंबर २००८ मध्ये एटीएसने अटक केली. विशेष न्यायालयाने यापूर्वी दोनदा त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पुरोहितने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. साध्वीनेही आदेशाला आव्हान दिले असल्याने दोन्ही याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी घेऊ, असे म्हणत उच्च न्यायालयाने पुरोहितचा अपील दाखल करून घेत त्यावरील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवली.
मात्र एनआयएतर्फे अॅड. संदेश पाटील यांनी पुरोहितच्या जामीन अर्जावर आक्षेप घेत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करू, असे उच्च न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)