डाळिंबाचे भाव गडगडले

By Admin | Updated: September 2, 2014 00:57 IST2014-09-02T00:35:10+5:302014-09-02T00:57:52+5:30

निर्यात बंदीमुळे उत्पादकांना फटका : ४५ रूपये किलोचा ठोक भाव

The prices of pomegranate collapsed | डाळिंबाचे भाव गडगडले

डाळिंबाचे भाव गडगडले

बुलडाणा : डाळींबाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणल्यामुळे डाळींबाचे भाव घसरले आहेत. एरव्ही १00 ते १२0 रूपये प्रति किलो भावाने विकले जाणारे डांळीब आता थोक बाजारपेठेत २0 ते ६0 रूपये प्रति किलोपर्यंत घसरले असल्याने डांळींब उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे. गत काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा फलोत्पादनाकडे कल वाढला असून, विदर्भात फळांच्या लागवडीत डाळींबाला सर्वाधिक पंसती आहे. जुलै महिन्याच्या प्रांरभीपासून बाजारात डाळींबाची आवक वाढली असून, भावही चांगला होता. निर्यातक्षम डाळींब साधारणपणे १२0 ते १२५ रूपये प्रति किलो दराने बाजारपेठेत विकला जात होता; मात्र १५ ऑगस्टपासून डाळींबावर निर्यात बंदी आल्याने बाजारपेठेत डाळींबाची आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी चांगल्या प्रतीच्या डाळींबाचे भाव ८0 ते ६0 रूपयांपर्यंत घसरले होते. आता हे भाव ४५ रूपयांपर्यंत उतरले आहेत. निर्यात बंदी नसती तर डाळींबाला चांगला भाव मिळाला असता, असे डाळींब उत्पादकांचे मत आहे.

Web Title: The prices of pomegranate collapsed