मुगाचे दर कोसळले!

By Admin | Updated: September 6, 2016 02:17 IST2016-09-06T02:17:13+5:302016-09-06T02:17:13+5:30

सप्टेंबरमध्ये ८,५00 रुपये प्रतिक्विंटलचे होते भाकीत.

The prices of the choke fell! | मुगाचे दर कोसळले!

मुगाचे दर कोसळले!

अकोला, दि. ५ : खरिपातील मूग काढणीचा हंगाम सुरू झाला आहे; पण अचानक हंगामाच्या तोंडावरच मुगाचे दर कोसळल्याने शेतकरी हैराण झाला आहे. कृषी अर्थशास्त्र, सांख्यिकी व केंद्रीय कृषी विपणन केंद्राने सप्टेंबर महिन्यात मुगाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. हे विशेष.
मागील दहा वर्षांपासून पाऊस साथ देत नसल्याने मुगाचे क्षेत्र अलीकडच्या काळात कमी झाले; पण यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मुगाची पेरणी केली. पश्‍चिम विदर्भात यावर्षी जवळपास १ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी केली आहे. महाराष्ट्र हे मुगाचे प्रमुख उत्पादक राज्य असून, अकोला, लातूर, अमरावती आणि जळगाव हे राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मुगाचे उत्पादन कमी झाल्याने मागील एक महिन्यापर्यंत दर नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले होते. या सर्व परिस्थितीचा व बाजारपेठेचा आढावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग तसेच राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था, कृषी विपणन केंद्राच्या संशोधन चमूने घेतला होता. या चमूने लातूर बाजारपठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील मुगाच्या मासिक सरासरी किमतीचे पृथक्करण केले होते. त्यांनी केलेला अभ्यास व निष्कर्षानुसार, बाजारपेठेतील सद्य:स्थिती कायम राहिल्यास सामान्य हवामानात, वेगवेगळ्य़ा प्रतीनुसार मुगाचा सप्टेंबर २0१६ या महिन्यात सरासरी दर आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती.

हंगामात दर कोसळले कसे?
मागील एक महिन्यापूर्वी मुगाचे प्रतिक्विंटल दर हे ९ हजार रुपये प्रतिक्विंटल होते; पण मूग काढणीचा हंगाम येताच मुगाचे प्रतिक्विंटल ३,८00 ते ४,२५0 पर्यंत खाली आले आहेत. केंद्रीय कृषी विपणन संशोधन केंद्राने सप्टेंबर महिन्यात मुागचे दर ८,५00 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली असताना हे दर कोसळले कसे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

Web Title: The prices of the choke fell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.