शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले; भाजीपाल्यासह डाळींनी ओलांडली शंभरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:26 IST

मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यभर कोरोनाचा कहर सुरू असतानाच त्यात महाभाईची भर पडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह डाळींचा तुटवडा निर्माण झाला असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा १६० ते १८० रुपये प्रतिकिलो व शेवगा शेंगांसह फरसबी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. सप्टेंबरमध्ये होलसेल मार्केटमध्ये २६ ते ३६ रुपये किलो दराने विकली जाणारी फरसबी ६० ते ७० रुपयांवर गेली असून किरकोळमध्ये हे दर ८० ते १०० रुपये झाले आहेत. बीट, फ्लॉवर, शेवगा शेंग, वाटाणा, आले या सर्वांचे दर वाढले आहेत. एपीएमसीमध्ये कांद्याचे दर २८ ते ४० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमधील दर ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत.महागाईची तीन कारणेराज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवक घटली आहे.डाळींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात पुरेसा साठा नाही व आयातही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे डाळींचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत.सप्टेंबर अखेरीस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. यामुळे बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत.सप्टेंबरच्या अखेरीस राज्यभर झालेल्या मुसळधार पावसाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक कमी होत असल्यामुळे दर वाढू लागले असून पुढील काही दिवस मार्केटमध्ये बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे.- शंकर पिंगळे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबई बाजार समिती व किरकोळ मार्केटमधील बाजारभाववस्तू              ७ सप्टेंबर      ७ आॅक्टोबर    ७ आॅक्टोबर                   (एपीएमसी)     (एपीएमसी)      (किरकोळ)कांदा             १३ ते २३          २८ ते ४०          ५० ते ६०वाटाणा         ९० ते ११०       १०० ते १४०       १६० ते १८०फरसबी         २६ ते ३६         ६० ते ७०         ८० ते १००फ्लॉवर           २० ते २४         २५ ते ३५         ८०ते १००शेवगा शेंग      ४५ ते ५५        ५० ते ६०         ८० ते १००बीट                १६ ते २४         २८ ते ३६         ५० ते ६०आले               ३० ते ५०         ४५ ते ६०         ६० ते ८०चनाडाळ        ५५ ते ६०         ५८ ते ६५        ७० ते ७५मसूरडाळ      ६० ते ६५         ६३ ते ६८         ८० ते ९०उडीदडाळ    ७० ते ९०          ७५ ते ९५        ९० ते १००तूरडाळ         ८० ते ९०           ८५ ते ९५        ९० ते १२०मूगडाळ        ९५ ते १००        ९५ ते १०५       १०० ते १२०

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई