काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला!
By Admin | Updated: October 9, 2014 04:37 IST2014-10-09T04:37:23+5:302014-10-09T04:37:23+5:30
कलिना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कप्तान मलिक यांच्यात जोरदार चुरस रंगली आहे.

काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला!
कलिना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कप्तान मलिक यांच्यात जोरदार चुरस रंगली आहे. गत विधानसभेचा निकाल पाहता या मतदारसंघात मनसेचे उमेदवार चंद्रकांत मोरे हे निर्णायक असले तरी शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीस आणि भाजपाचे अमरजित सिंह यांचे कडवे आव्हान कृपाशंकर आणि कप्तान यांच्यासमोर आहे. आघाडी तुटल्यानंतर काँग्रेसकडे कलिनातून उमेदवारी देण्यासाठी कृपाशंकर सिंह यांच्याव्यतिरीक्त दुसरा पर्याय नव्हता.
उमेदवारी मिळेल, अशी आशा लावून बसलेले कप्तान यांच्या पदरी निराशा पडल्यानंतर त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचा रस्ता धरला. साहजिकच राष्ट्रवादीकडे देखील दुसरे नाव नसल्याने कप्तान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कलिना हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी सध्या राष्ट्रवादी आणि मनसेच्या प्रचाराने येथे जोर धरला आहे. परिणामी येथे लक्ष्यवेधी तिरंगी लढत रंगली आहे.