जात पंचायतीकडून साक्षीदारांवर दबाव
By Admin | Updated: November 24, 2014 03:03 IST2014-11-24T03:03:01+5:302014-11-24T03:03:01+5:30
जातीत घेण्यासाठी विधवा महिलेकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या जात पंचायतीच्या पंचांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी साक्षीदारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

जात पंचायतीकडून साक्षीदारांवर दबाव
संगमनेर (अहमदनगर) : जातीत घेण्यासाठी विधवा महिलेकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या जात पंचायतीच्या पंचांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी साक्षीदारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. खंडणीचा गुन्हा दाखल होवून पाच दिवस उलटले तरी आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश न आल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पतीच्या खून प्रकरणी शांताबाई शिंदे यांच्यासह इतर दोघांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. मात्र जात पंचायतीच्या पंचांनी परंपरागत न्याय-निवाडा करण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी २ लाख ६० हजार रूपये घेत जातीतून बहिष्कृत केले. पुन्हा जातीत घेण्यासाठी पंचांनी १५ लाखांची मागणी केली होती. त्याच दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जात पंचायत मूठमाती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे कुटुंबियांची भेट घेवून त्यांना मदत केली. शांताबार्इंनी जात पंचायतीचे मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी व इतर २० जणांविरूद्ध लोणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यानंतर शांताबार्इंचा मुलगा अविनाश याला जीवे मारण्याची धमकी आली.