‘सनातन’कडून साक्षीदारावर दबाव
By Admin | Updated: January 6, 2016 02:10 IST2016-01-06T02:10:31+5:302016-01-06T02:10:31+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे परंतु अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र सनातन

‘सनातन’कडून साक्षीदारावर दबाव
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे परंतु अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे. त्यातील भाषा संरक्षणाची असली तरी मूळ उद्देश वेगळा आहे. साक्षीदारावर थेट दडपण आणण्याचा प्रयत्न ‘सनातन’चा आहे, असे स्पष्ट मत मेघा पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
‘सनातन’च्या वतीने अॅड. संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या पत्त्यावर हे पत्र पाठविले आहे. एका अत्यंत संवेदनशील खटल्यातील तितक्याच गंभीर पत्राबाबत पोलिसांनी बेफिकीरी दाखविली होती. पत्राच्या मथळ्यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. मेघा पानसरे व कॉ. दिलीप पोवार यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली. तेव्हा पत्राची सर्व स्तरांवर दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश देशपांडे यांनी तपास पथकांना दिल्याचे सांगितले. साक्षीदाराच्या संरक्षणाची पूर्णत: जबाबदारी आमची आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. ‘सनातन’च्या पत्राची दखल पोलिसांनी घेतली नव्हती. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस खडबडून जागे झाले. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सायंकाळी शाळकरी मुलाच्या घरी भेट देऊन पालकांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)