बटण दाबले की, नोटाला मतदान
By Admin | Updated: February 21, 2017 18:56 IST2017-02-21T18:56:32+5:302017-02-21T18:56:32+5:30
आजरा तालुक्यातील गवसे मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर मतदानासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर नोटा या पर्यायसमोर आवाज होत

बटण दाबले की, नोटाला मतदान
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील गवसे मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर मतदानासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर नोटा या पर्यायसमोर आवाज होत असल्याचा प्रकार दुपारी दोनच्या सुमारास घडला. त्यामुळे या केंद्रावरील मतदान थांबविण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत येथील मतदान प्रक्रिया थांबविली होती.
करवीर तालुक्यातील महे येथील मतदान केंद्रावर हुल्लडबाजी करणाऱ्या पाच ते सहा युवकांना पोलीसांनी मारहाण केली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.