शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मविआची मते फुटणार?; २०० पेक्षा जास्त मते द्रौपदी मुर्मूंना मिळणार, भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 09:58 IST

७० टक्क्यापेक्षा जास्त मते एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळून त्या विजयी होतील असं विधान भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपर्दी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून संयुक्त उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. २१ जुलैला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करण्याची मुदत आहे. 

या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते फुटतील असा दावा करण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ७० टक्क्यापेक्षा जास्त मते एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळून त्या विजयी होतील. राज्यसभेला शिवसेना सोबत नसताना आम्हाला १० मते जास्त पडली. विधान परिषदेत २२ मते अतिरिक्त पडली. आता शिवसेना सोबत आहे. त्यामुळे २०० पेक्षा जास्त मतदान होईल. यशवंत सिन्हा यांच्याबाबत महाराष्ट्रात कुणाला रस नाही. राज्यसभा, विधान परिषदेचा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. जे कुणी मागच्या वेळी विधानसभा अध्यक्ष, बहुमत चाचणीला नव्हते ते सुद्धा एनडीएच्या उमेदवाराला मतदान करतील असा दावा पाटील यांनी केला. 

तसेच भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते. आजारी आमदारांची विचारपूस केली जाते परंतु ते काँग्रेसमध्ये होत नाहीत. त्यामुळे नाना पटोले अशी विधान करत आहेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटतील असं वाटत नाही. परंतु साम,दाम दंड भेद वापरून भाजपा रणनीती करत आहे. ही विकृती देशाच्या लोकशाहीला धोकादायक आहे असं विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे. 

शिवसेना पुन्हा ताकदीनं उभी राहील - राऊतद्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील नेतृत्व असल्याने त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना एनडीएमध्ये नाही. यापूर्वीही प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला नाही. जी परिस्थिती येईल त्याला सामोरं जायचं. पुन्हा ताकदीने पक्ष उभा करू असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा