एकनाथ खडसेंबाबतचा निर्णय पक्षाध्यक्षच घेतील - मुख्यमंत्री
By Admin | Updated: June 2, 2016 18:50 IST2016-06-02T18:36:00+5:302016-06-02T18:50:25+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील अहवाल अमित शहा यांच्याकडे सोपविला आहे.

एकनाथ खडसेंबाबतचा निर्णय पक्षाध्यक्षच घेतील - मुख्यमंत्री
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील अहवाल अमित शहा यांच्याकडे सोपविला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात अमित शहांची गुरुवारी भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात 40 मिनिटे चर्चा झाली. यावेळी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भातील अहवाल त्यांनी शहा यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच, खडसेंवरील कारवाईचा निर्णय अमित शहाच घेतील असे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी येथील एमआयडीसी भूखंड खरेदी, गजानन पाटील लाच प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कथित कॉल, असे आरोप करण्यात आले असून यासंदर्भात अमित शहा यांनी अहवाल मागितला होता.