सहा दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्या

By Admin | Updated: July 21, 2014 03:35 IST2014-07-21T03:35:06+5:302014-07-21T03:35:06+5:30

बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोली, १३ मुलांचे अपहरण करून त्यापैकी ९ जणांची निर्घृण हत्या

The President has rejected six mercy petitions | सहा दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्या

सहा दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्या

नवी दिल्ली : बहुचर्चित निठारी हत्याकांडातील दोषी सुरेंद्र कोली, १३ मुलांचे अपहरण करून त्यापैकी ९ जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या महाराष्ट्रातील रेणुका व सीमा या दोघी बहिणी तसेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणारा महाराष्ट्राच्याच अमरावती जिल्ह्यातील राजेंद्र वासनिक यांच्यासह एकूण सहा जणांच्या दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावल्या आहेत़
दयेचे हे अर्ज फेटाळण्याची गृह मंत्रालयाची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली. कोलीने उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील निठारी भागात मुलांची निर्घृण हत्या करीत नंतर त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून नाल्यात फेकले होते़ २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते़ यासंदर्भात कोलीविरुद्ध १६ प्रकरणे दाखल केली होती़ यापैकी चार प्रकरणांत त्याला फाशी ठोठावण्यात आली आहे; अन्य प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत़
महाराष्ट्राच्या रेणुकाबाई आणि सीमा या दोन बहिणींनी ९ मुलांची हत्या केली होती़ तिसरे प्रकरण महाराष्ट्राच्या आसरा गावाचे आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The President has rejected six mercy petitions