सामाजिक जाणिवेतून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे जतन

By Admin | Updated: October 8, 2016 00:58 IST2016-10-08T00:58:06+5:302016-10-08T00:58:06+5:30

शहराच्या विविध भागात राष्ट्रपुरुषांचे पुतळे महापालिकेने उभारले आहेत.

Preserve the statues of national heroes through social understanding | सामाजिक जाणिवेतून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे जतन

सामाजिक जाणिवेतून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे जतन


पिंपरी : शहराच्या विविध भागात राष्ट्रपुरुषांचे पुतळे महापालिकेने उभारले आहेत. या पुतळ्याची देखभाल आणि सुरक्षा याची जबाबदारी महापालिकेतर्फेच घेतली जात होती. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. पुतळा समिती स्थापन होऊन या समितीच्या माध्यमातून पुतळ्याची देखभाल योग्य प्रकारे केली जात आहे. महापालिकेवर अवलंबून न राहता विविध समाज संघटनांचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करू लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Preserve the statues of national heroes through social understanding