मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
By Admin | Updated: February 4, 2015 16:27 IST2015-02-04T16:16:17+5:302015-02-04T16:27:13+5:30
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सकाळी सादर करण्यात आला. ३३ हजार ५१४ कोटींचा अर्थसंकल्प असून २३३६ कोटी रुपयांची भर टाकण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सकाळी सादर करण्यात आला. ३३ हजार ५१४ कोटींचा अर्थसंकल्प असून या वर्षी २३३६ कोटी रुपयांची भर टाकण्यात आली आहे. या अर्थसंकल्पासाठी २०० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.
अत्याचारग्रस्त महिलांसाठी दिलासा केंद्र, कोस्टल रुट आणि रुग्णालयात योगा थेरीपी इत्यादी उपक्रम नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणखात्यासाठी २५०१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असून त्यात व्हर्चुअल क्लासरुम, इंटरनेटद्वारे सर्व शाळांची जोडणी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना आखण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या तीन रुग्णालयात योगा थेरीपी चा उपक्रम नव्याने राबवला जाणार आहे. एमएमआरडीएच्या इमारतींच्या स्वच्छतेकडेही या अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले असून झोपडपट्टीवर मालमत्ताकर आकारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कोस्टल रुट साठी तब्बल २०० कोटींची तरतूद सदर अर्थसंकल्पात आहे.तळोजायेते डंपींग ग्राऊंड उभारण्यात येणार असून त्याकरता राज्यसरकारकडे १२६ हेक्टरची मागणी करण्यात आली आहे. उपनगरांत अत्याचारग्रस्त महिलांसाठी ११ दिलासाकेंद्र उभारण्यात येणार आहेत. गोरेगाव- मुलुंड लिंकरोडचे बांधकाम आणि संपूर्ण मुंबई शहरात एलइडी लाइट लावण्यात येणार असल्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.