शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

ध्यास विज्ञान प्रसाराचा...

By admin | Updated: February 12, 2017 00:47 IST

शासनाने आजवर छापलेल्या परिभाषा कोशात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, साहित्य समीक्षा, यंत्र अभियांत्रिकीशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाविज्ञान

- अ. पां. देशपांडे शासनाने आजवर छापलेल्या परिभाषा कोशात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, साहित्य समीक्षा, यंत्र अभियांत्रिकीशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या, तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र, समाजशास्त्र, औषधशास्त्र, मानसशास्त्र, धातुशास्त्र, संख्याशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, कृषिशास्त्र, वृत्तपत्रविद्या, वाणिज्यशास्त्र, भूगोलशास्त्र, शारीरक्रियाशास्त्र, व्यवसाय व व्यवस्थापनशास्त्र, भूशास्त्र, विद्युत अभियांत्रिकीशास्त्र, शिक्षणशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकीशास्त्र, न्यायवैद्यक व विषशास्त्र आणि शरीर परिभाषाशास्त्र यांचा समावेश आहे. १९५७ साली रशियाने अवकाशात स्पुटनिक उडवला. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले, १९६५पासून भारतात हरित क्रांती सुरू झाली. या प्रत्येक घटनेच्या वेळी लोक विचारत, हे काय चालले आहे, कशासाठी, याचा आम जनतेला काय फायदा आणि धोका? पण हे लोकांना समजून सांगण्यासाठी त्या वेळी विज्ञान संस्था नव्हत्या. त्या वेळी समाजात होत्या साहित्य संस्था, गायनशाळा, इतिहास मंडळे आणि क्रीडा संस्था. पण विज्ञानातल्या या प्रश्नांची उत्तरे यापैकी कोणी देऊ शकत नव्हते. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात होती असे नसून ती भारतभर सगळ्या राज्यांत होती आणि याच दशकात भारताच्या सर्व राज्यांत त्या त्या राज्यांच्या विज्ञान परिषदा स्थापन झाल्या. अपवाद एकच आणि तो म्हणजे १९१४ साली अलाहाबादला सुरू झालेली हिंदी विज्ञान परिषद. या संस्थेने २०१४ साली आपली शताब्दी साजरी केली. बाकी राज्यांत सुरू झालेल्या परिषदांत केरळ शास्त्र साहित्य परिषदेची स्थापना १९६४ साली झाली तर मराठी विज्ञान परिषदेची स्थापना १९६६ साली झाली. या दोन्ही राज्यांतील विज्ञान परिषदांनी आपापली ५० वर्षे पूर्ण केली. त्यानंतर कर्नाटक राज्य विज्ञान परिषद, दिल्ली सायन्स फोरम, पश्चिम बंग विज्ञान परिषद अशा संस्था सुरू झाल्या. या संस्थांनी गेल्या ५० वर्षांत केलेल्या विज्ञानप्रसारामुळे आता भारतात, विशेषत: महाराष्ट्रात मराठीतून लिखाण करू शकणारे, भाषणे देऊ शकणारे, विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवणारे तज्ज्ञ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० साली झाल्यावर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची आणि भाषा संचालनालयाची स्थापना झाली. त्या वेळी विश्वकोश मंडळ हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचाच एक भाग होता आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्याचे अध्यक्ष होते. १९६७ साली महाराष्ट्रातल्या विद्यापीठांनी (त्या वेळी मुंबई, पुणे, एस.एन.डी.टी., नागपूर आणि कोल्हापूर एवढीच विद्यापीठे होती. आता त्यांची संख्या तेरा झाली आहे.) आणि मराठी विज्ञान परिषदेने महाराष्ट्र शासनाला मराठीतून परिभाषा कोश निर्माण करण्यासाठी विनंती केली होती. त्याला अनुसरून भाषा संचालनालयाने कोल्हापूरला ‘प्रमाण परिभाषा’ या विषयावर एक बैठक आयोजित करून परिभाषा समित्या निर्माण केल्या. पहिल्या प्रथम भौतिकी व नंतर रसायन शास्त्रासाठी समित्या नेमल्या गेल्या आणि त्याचे अध्यक्षपद तेव्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य गो.रा. परांजपे यांना देण्यात आले होते.या समित्यांवर प्रत्येक विद्यापीठाचा त्या त्या विषयातील एकेक प्राध्यापक असे. मराठी विज्ञान परिषदेनेही अशीच मागणी केल्याने या सर्व समित्यांवर इतर विद्यापीठांच्या बरोबरीने मराठी विज्ञान परिषदेलाही स्थान देण्यात आले होते. शिवाय इंग्रजीतील संज्ञांना अनुरूप मराठी शब्द बनवणे सोयीचे जावे यासाठी या समित्यांवर एकेक संस्कृत तज्ज्ञाचीही नेमणूक केलेली असे आणि ही प्रथा आजही सुरू आहे. गेल्या वर्षी काही नवीन विषयांवर अथवा जुन्या कोशांची नवीन आवृत्ती काढण्याच्या निमित्ताने स्थापन झालेल्या समित्यांवरही अशीच तरतूद केलेली आहे. आजवर भाषा संचालनालयाने २८ कोश प्रकाशित केले असून काही कोशांच्या दुसऱ्या आवृत्त्याही प्रकाशित झाल्या आहेत. आताही योग, आपत्कालीन परिस्थिती, संगणकशास्त्र, अब्जांशशास्त्र इत्यादी नवनवीन विषयांवर तर अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र, शिक्षणशास्त्र अशा विषयांच्या नवीन आवृत्या तयार करण्याचे काम चालू आहे. या कोशात छापलेल्या संज्ञा शालेय पाठ्यपुस्तकात वापरल्या जाव्यात असे शासनाने सुचवल्याने गेली ३०-४० वर्षे ही मराठीत सिद्ध झालेली परिभाषा पाठ्यपुस्तकात वापरली जात आहे. ही परिभाषा वर्तमानपत्रात व वक्त्यांनी भाषणातही वापरावी अशी शासनाची विनंती आहे.

-  apd1942@gmail.com