शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

‘दिवा’ काढण्याबाबत पश्चिम वऱ्हाडात तत्परता!

By admin | Updated: April 20, 2017 00:46 IST

कृषी मंत्री, गृहराज्यमंत्र्यांनी काढला दिवा : बुलडाणा जि.प. अध्यक्षांचाही पुढाकार

अकोला : मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीचा लाल दिवा १ मे पासून काढण्यात येणार असल्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाने बुधवारी निर्णय घेतला आहे. ‘दिव्या’चा अधिकार असलेल्या पश्चिम वऱ्हाडातील दोन्ही मंत्र्यांनी तसेच राज्यमंत्रीपदाचे दर्जा असलेल्या महामंडळ अध्यक्ष व जि.प. अध्यक्षंनी या निर्णयाचे स्वागत करून दिवा काढण्याच्या आदेशाची तत्काळ अमंलबजावणी केली. तर अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशातील स्पष्टता समोर आल्यावर आपल्या गाडीवरचा लाल दिवा लगेच काढला जाईल अशी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. केंद्राने लाल दिव्याला तिलांजली दिल्यानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी लाल दिवा वापरणे बंद केल्यामुळे त्यांचे मंत्री मंडळातील सहकारी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनीही गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला. कृषीमंत्री मंगळवारी दूपारी सह्यांद्री विश्रामगृहावर विविध बैठका घेत असताना त्यांना या निर्णयाची माहिती मिळाली. बैठक संपवून आपल्या शासकीय निवासस्थानी प्रस्थान करताना त्यांनी दिवा काढण्याच्या सूचना चालकाला देऊन विना दिवा गाडीमधून प्रवास केला. राज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील हे बुधवारी सकाळपासूनच मंत्रालयात होते. दिव्या संदर्भातील निर्णय कळताच त्यांनी त्यांच्या सचिवांना सांगुन तत्काळ दिवा काढण्याची सूचना केली. मंत्रालयातील कामकाज संपताच त्यांनी दिवा नसलेल्या गाडीमधून निवासस्थानापर्यंत प्रवास केला. या संदर्भात ‘लोकमत’ शी बोलतांना त्यांनी सांगीतले की, हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे, लालदिव्यामुळे अनेकदा रहदारी थांबवून गाडीला मार्ग काढून दिल्या जात असे त्यामुळे थांबलेल्या वाहनांमधील अ‍ॅम्बुलन्स असेल किंवा सामान्य नागरीक असतील त्यांना नाहक त्रास होत असे. मी मंत्री झाल्यावर निवासस्थानावर देण्यात येत असलेला बंदोबस्तही नाकारला होता त्यामुळे हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनीही या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून आपल्या गाडीवरील दिवा हटविला. बुलडाण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा उमा शिवचंद्र तायडे यांनाही राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेला लाल दिवा तत्काळ काढून टाकला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे तसेच वाशीम जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी देखील केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करून आदेश प्राप्त होताच वाहनावरील लाल दिवा हटविला जाईल, असे सांगितले. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या वाहनावर अंबर दिवा आहे त्यांनी सांगीतले की, शासनाचे दिशानिर्देश प्राप्त होताच धोरणानुसार तत्काळ कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनीही शासनाचे आदेशातील स्पष्टता समोर आल्यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगीतले. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय मान्य आहे. याबाबतचे आदेश प्राप्त होताच वाहनावरील दिवा हटविण्यात येईल. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनीही आपल्या प्रतिक्रियेत वाहनावरील लाल दिवा हटविण्याच्या निर्णयाचे समर्थन करित यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर लगेच कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.