लोकशाहीची किंमत चुकवायची तयारी ठेवा
By Admin | Updated: July 27, 2014 00:36 IST2014-07-27T00:36:08+5:302014-07-27T00:36:08+5:30
समोर जे आहे ते बरे नसेल, तर त्यात बदल करण्याची हिंमत दाखवायला हवी. त्यासाठी दुसरे कुणी उभे राहील, याची वाट न पाहता आपले आपण उभे राहायला हवे.

लोकशाहीची किंमत चुकवायची तयारी ठेवा
पुणो : समोर जे आहे ते बरे नसेल, तर त्यात बदल करण्याची हिंमत दाखवायला हवी. त्यासाठी दुसरे कुणी उभे राहील, याची वाट न पाहता आपले आपण उभे राहायला हवे. कारण, स्वतंत्र विचार, लोकशाही इतकी साधी नाही. त्याची किंमत चुकवायची तयारी आपण ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केले.
सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे अमृतमहोत्सवी सत्काराला उत्तर देताना प्रा. भावे बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, विद्या बाळ, सय्यदभाई, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, शेखर सोनाळकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी होते. अन्वर राजन यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष वारे यानी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
कुठल्याही गोष्टीपेक्षा आज देशातील विषमता अधिक स्फोटक आहे. धर्मनिरपेक्षता, समता, समाजवाद या मूल्यांशी घेतलेली फारकत लोकांच्या मनात खदखदते आहे.-डॉ. बाबा आढाव
4भावे म्हणाल्या, ‘‘आज आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्याला आपणच जबाबदार आहोत. कारण, कुणीच धोका पत्करायला तयार नाही. आपल्याला जे म्हणायचंय ते उंच आवाजात म्हणायला हवे. त्यासाठी मत परखड हवे. ते असेल तरच आत्मसन्मानाने जगणो शक्य होते. येणा:या प्रश्नाना तोंड द्यायचे, तर एकमेकांशी बोलयला हवे. जर आपले हात एकमेकांच्या हातात असतील आणि कुठे जायचे, हे माहीत असेल, तर अजून उशीर झालेला नाही, याबाबात मी आशावादी आहे.’’
पुष्पाताई या महाराष्ट्राच्या विवेकाचे प्रतिबिंब आहेत. तिच्या क्षमतेपेक्षा फार कमी लिहिते, एवढीच तक्रार आहे. पुरोगामी विचारांपुढे आज अनेक आव्हाने आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांनीही व्यक्त केली.
- विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या.