पेन्शन योजनेचा आराखडा स्वबळावर तयार करा - ऊर्जामंत्री

By Admin | Updated: January 16, 2016 01:49 IST2016-01-16T01:49:48+5:302016-01-16T01:49:48+5:30

वीज कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना स्वबळावर राबविण्यासाठीचा आराखडा ३१ मार्चपर्यंत तयार करण्यात यावा, अशी सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेन्शन समितीला केली आहे.

Prepare the pension plan on self-power - the energy minister | पेन्शन योजनेचा आराखडा स्वबळावर तयार करा - ऊर्जामंत्री

पेन्शन योजनेचा आराखडा स्वबळावर तयार करा - ऊर्जामंत्री

मुंबई : वीज कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना स्वबळावर राबविण्यासाठीचा आराखडा ३१ मार्चपर्यंत तयार करण्यात यावा, अशी सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेन्शन समितीला केली आहे. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीसोबत झालेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.
प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी असणाऱ्या सोयी-सुविधा पुरवण्यात याव्यात, असे निर्देश देत तांत्रिक कामगारांकडे मेडिकल बोर्डाचे वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असल्याचे प्रमाणपत्र असेल तर त्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येईल; आणि इतर कामगारांच्या स्वेच्छा निवृत्तीबाबत
३१ मार्चपर्यंत निर्णय घेण्यात
येईल, असेही बावनकुळे यांनी बैठकीत नमूद केले. (प्रतिनिधी)

Web Title: Prepare the pension plan on self-power - the energy minister