लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंबईत ९ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक झाली. त्यात मोर्चाचा प्राथमिक नियोजन आराखडा मांडण्यात आला.आराखड्याविषयी मुंबई पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर २५ जुलैला मुंबईत बैठक घेऊन संपूर्ण राज्यभरातून येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांना मुंबईत येण्यासाठीचे नियोजन कळविण्यात येईल. औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, नागपूर, बुलडाणा, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग, धुळे आदी जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग नोंदविला व मत मांडले. सूक्ष्म नियोजन होणार महिला व ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये व नगरपालिकेची मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त झाली. मुंबईतील मराठा समाजाच्या कु टुंबीयांनी त्यांच्या गावातून आणि परिसरातून मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांची आपल्या घरीच व्यवस्था करावी, असे ठरले. रेल्वे आरक्षणाबाबतही चर्चा झाली. जालना जिल्ह्यातील प्रतिनिधींनी जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या समाज बांधवांसाठी एक संपूर्ण रेल्वेगाडीचे आरक्षण करण्याची तयारी दाखविली. त्यांच्या सूचनेला बहुतांश जिल्ह्यातील प्रतिनिधींनी सहमती दर्शविली. बैठकीतील ठराव मराठा संघटनांच्या सहभागातून कोपर्डीत १३ जुलैला कॅण्डलमार्च काढणे.राज्यात २४ जूनला एकाचवेळी जिल्हास्तरीय बैठक घेऊन मुंबई मोर्चाचे नियोजन करणे.गाव, तालुका, जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करून दर तीन दिवसांनी तयारीचा आढावा घेणे. समिती सदस्यांनी मोर्चाच्या तीन दिवस आधी मुंबईत जाऊन जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचे, मोर्चेकऱ्यांच्या निवासाचे जिल्हावार नियोजन करणे.जिल्हास्तरीय समितीने मुंबईत महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी व निवासस्थानासाठी मदत करणे.मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी राज्यस्तरावर १० तज्ज्ञ वकिलांची उच्चस्तरीय समिती नेमणे.मुंबईत कॅण्डल मार्चकोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबई समितीने १३ जुलैला सायंकाळी ‘गेट वे आॅफ इंडिया’ येथे ‘कॅण्डल मार्च’ काढणार असल्याचे सांगितले. महामुंबई समितीने ‘मराठा जोडो अभियान’ राबवण्याची घोषणा केली.
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरू
By admin | Updated: June 19, 2017 01:29 IST