नाट्यगृहांचे संकेतस्थळ तयार करणार
By Admin | Updated: May 7, 2015 03:14 IST2015-05-07T03:14:31+5:302015-05-07T03:14:31+5:30
राज्यातील नाट्यगृहांच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने त्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. १५ मे पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

नाट्यगृहांचे संकेतस्थळ तयार करणार
पुणे : राज्यातील नाट्यगृहांच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने त्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. १५ मे पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर नाट्यगृहांची माहिती घरबसल्या मिळण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्याच्या दृष्टीनेही पावलेही उचलली जाणार आहेत.
नाट्यगृहांची योग्य देखभाल न ठेवणे, मनुष्यबळाचा अभाव, बांधकामात वास्तुरचनेच्या दृष्टीने उणीवा असण्याचा नाट्यनिर्माता, कलावंत व रसिकांनाही त्रास होत असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. त्याची दखल घेऊन सांस्कृतिक संचालनालय राज्यभरातील नाट्यगृहांचे सर्वेक्षण करणार आहे.
आतापर्यंत मुंबई, पुणे,औरंगाबाद, नागपूर, वर्धा आणि परभणीतील नाट्यगृहांची पाहणी करण्यात आल्याची माहिती मुख्य समन्वयक नाबिद इनामदार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. हा अहवाल शासनाला सादर केल्यानंतर पुढच्या टप्प्यात नाट्यगृहांसाठी अधिकृत संकेतस्थळ विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.