पालिकेची स्वच्छतापूर्ण स्वागतासाठी तयारी

By Admin | Updated: June 19, 2014 23:46 IST2014-06-19T23:46:18+5:302014-06-19T23:46:18+5:30

संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्यांचे पुण्यात भावपूर्ण व स्वच्छतापूर्ण स्वागत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागाच्या तयारीचा आढावा गुरुवारी घेतला.

Preparation for cleanliness of the corporation | पालिकेची स्वच्छतापूर्ण स्वागतासाठी तयारी

पालिकेची स्वच्छतापूर्ण स्वागतासाठी तयारी

>पुणो : संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्यांचे पुण्यात भावपूर्ण व स्वच्छतापूर्ण स्वागत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागाच्या तयारीचा आढावा गुरुवारी घेतला. महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन व मदत कक्षाद्वारे विविध विभागात समन्वय ठेवून वारक-यांना पाणी, आरोग्य व स्वच्छतागृहाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. 
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा आळंदी रस्त्यावरील कळस येथे महापालिका हद्दीत सकाळी 11 वाजता आणि संत तुकाराम महाराज पालखीचे दुपारी 1 वाजता बोपोडी येथे महापौर चंचला कोद्रे व उपमहापौर बंडू गायकवाड यांच्या हस्ते स्वागत होणार आहे. त्यानंतर मुंबई-पुणो रस्त्यावरील पाटील इस्टेट झोपडपट्टी येथील चौकांत दोन्ही पालख्यांचे एकत्रित स्वागत महापालिकेचे पदाधिकारी दुपारी 3 वाजता करणार आहेत.   याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, विद्युत, आरोग्य, अतिक्रमण व अपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयासाठी संपर्क कक्ष उभारण्यात आला आहे, असे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणोश सोनुने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
महापालिका मदत कक्ष 
सुरक्षा विभाग : 9689931131
व्हेईकल डेपो : 96899319क्1
आपत्कालीन विभाग : 9689931511
अग्निशमन केंद्र : 1क्1 आणि 9689931991

Web Title: Preparation for cleanliness of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.