प्रीती झिंटा अडकणार लग्नाच्या बेडीत ?
By Admin | Updated: February 19, 2016 16:22 IST2016-02-19T16:22:58+5:302016-02-19T16:22:58+5:30
अभिनेत्री प्रीती झिंटा बॉयफ्रेंड जेन गुडेनफसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. लॉस ऐंजेलिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे

प्रीती झिंटा अडकणार लग्नाच्या बेडीत ?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - अभिनेत्री प्रीती झिंटा बॉयफ्रेंड जेन गुडेनफसोबत लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. लॉस ऐंजेलिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्च किंवा एप्रिलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची तारीख अजूनही ठरलेली नाही आहे. या लग्नाला फक्त जवळच्याच लोकांना आमंत्रित केले जाणार आहे.
लॉस ऐंजेलिसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार असला तरी लग्नानंतर मुंबईतदेखील कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मित्र, नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रेटीजना आंमत्रित केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.