प्रीतीचा जबाब सोमवारी?

By Admin | Updated: June 21, 2014 01:51 IST2014-06-21T01:51:00+5:302014-06-21T01:51:00+5:30

पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी प्रीती लॉस एन्जेलीसहून मुंबईला येण्यासाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Preeti's responses on Monday? | प्रीतीचा जबाब सोमवारी?

प्रीतीचा जबाब सोमवारी?

>मुंबई : पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी प्रीती लॉस एन्जेलीसहून मुंबईला येण्यासाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार मरिनड्राइव्ह पोलीस रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी प्रीतीचा पुरवणी जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी प्रीती आज प्रवास सुरू करेल या वृत्ताला दुजोरा दिला.
पुरवणी जबाब नोंदविताना मरिनड्राइव्ह पोलीस प्रामुख्याने 3क् मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये तीन टप्प्यांमध्ये घडलेला प्रसंग प्रीतीकडून तपशीलवार समजावून घेणार आहेत. तसेच प्रत्येक घटना कधी घडली, घटना घडली तेव्हा आजूबाजूला कोण कोण उपस्थित होते हेही जाणून घेणार आहेत. याशिवाय 3क् मे रोजी ही घटना घडूनही तक्रार द्यायला इतका उशीर का, याचीही चौकशी पोलीस प्रीतीकडे करणार, असे समजते. (प्रतिनिधी)
 
वाडियांची सुरक्षा वाढवली
16 जून रोजी प्रीतीची बाजू घेत गँगस्टर रवी पुजारीने वाडिया कुटुंबीयांना धमक्या दिल्या आहेत. पुजारीची पाश्र्वभूमी पाहता मुंबई पोलिसांनी वाडिया यांचे निवासस्थान आणि कार्यालयांबाहेरील बंदोबस्तात वाढ केली आहे. तीनेक वर्षापूर्वी पुजारी टोळीने शहरात गोळीबार सत्र सुरू केले होते.  
वाडिया यांना आलेला फोन पुजारीनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फोन वाडियांच्या ज्या कर्मचा:याने उचलला त्याचा जबाब गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक नोंदवून घेणार आहे. 
पुजारीने केलेला एसएमएस इराणहून आल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत स्पष्ट झाले. मात्र त्याने केलेले व्हीओआयपी कॉल कुठून केले, सव्र्हिस प्रोव्हायडर कोण हे जाणून घेण्यासाठी खंडणीविरोधी पथक तज्ज्ञ अधिका:यांचे मार्गदर्शन घेत असल्याचीही माहिती मिळते. 
 
धमक्यांबाबतही प्रीतीकडे चौकशी 
या प्रकरणी वाडिया कुटुंबीयांना गँगस्टर रवी पुजारीने प्रीतीची बाजू घेत धमक्या दिल्या. त्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू असला तरी मरिनड्राइव्ह पोलीस पुजारीच्या धमक्यांबाबतही प्रीतीकडे चौकशी करू शकतात. प्रीतीच्या सविस्तर जबाबातून या संपूर्ण घटनेवर प्रकाश पडेल. नवे साक्षीदार समोर येतील. नेमकी घटना कुठे, कधी घडली हे समजू शकेल, असे उपायुक्त शिसवे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Preeti's responses on Monday?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.