पूर्ववैमनस्यातून तलवार, लोखंडी रॉडने हल्ला
By Admin | Updated: July 12, 2017 21:01 IST2017-07-12T21:01:03+5:302017-07-12T21:01:03+5:30
वागळे इस्टेट, शिवशक्ती चाळीतील तानाजी शिंदे (२४) यांच्यावर पूर्ववैमनस्यातून रोशन दळवी, सागर साळवी, हेमंत दळवी आणि जयवंत कदम यांनी

पूर्ववैमनस्यातून तलवार, लोखंडी रॉडने हल्ला
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 12 - वागळे इस्टेट, शिवशक्ती चाळीतील तानाजी शिंदे (२४) यांच्यावर पूर्ववैमनस्यातून रोशन दळवी, सागर साळवी, हेमंत दळवी आणि जयवंत कदम यांनी तलवार आणि लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदे हे १० जुलैला रात्री कामावर असताना रक्ताचे नमुने गोळा करून ते भावाकडे देऊन घरी जात होते. पाचपाखाडी येथील नामदेववाडीतील एका किराणा दुकानाजवळ ते मित्रांसमवेत फोनवर बोलत उभे होते. तेव्हा रोशन दळवीसह चौघांनी तलवार, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी त्यांना जबर मारहाण केली. शिवाय, त्यांना मारण्याची धमकीही दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी ११ जुलै रोजी त्यांनी नौपाडा पोलिसांना माहिती दिली. या सर्व मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.